#AUSvIND : एकदिवसीय मालिकेसाठी धोनी,रोहित,चहल ऑस्ट्रेलियाला रवाना

नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवत मालिका जिंकल्यानंतर आता लक्ष्य एकदिवसीय मालिकेकडे असणार आहे.

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना हा 12 जानेवारीपासून सिडनी येथील क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. एकदिवसीय संघातील ज्या खेळाडूंचा कसोटी संघात समावेश नव्हता, ते खेळाडू एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

View this post on Instagram

Off to Australia ✈️ @mahi7781

A post shared by Khaleel Ahmed (@khaleelahmed13) on

महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा हे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

View this post on Instagram

Australia for ODI s 🇦🇺 ✈️ ✌️

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून मालिकेतील सामने हे अनुक्रमे 12 जानेवारी (सिडनी), 15 जानेवरी (एडिलेड) आणि 18 जानेवारी (मेलबर्न) रोजी होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)