‘मिसेज रणवीर सिंह’चा कान्समध्ये जलवा; चाहते घायाळ 

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचे सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मधील लूक्स चांगलेच चर्चेत आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यंदा दीपिका काहीशा हटके अवतारात कान्समध्ये सहभागी होत आहे. शुक्रवारी दीपिकाने कान्समध्ये ऑफव्हाइट कलर गाऊनने रेड कार्पेटवर दिमाखदार एंट्री मारली. यानंतर सर्व लूक्स तिने सोशल मीडियावर शेअर केले. प्रत्येक लूक हटके असल्याने दीपिकाने चाहत्यांची मने जिंकली. आजही दीपिकाने लाईम ग्रीन गाऊन परिधान केला असून डोक्यावर गुलाबी पगडीसारखे घातले आहे. दीपिका या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत असून नेटकरी घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर दीपिकाच्या आजच्या लूकची तुलना रणवीर सिंहाच्या फॅशन स्टेटमेंटसोबत केली जात आहे. काहींनी तर ‘परफेक्ट मिसेज रणवीर सिंह’ असेही म्हंटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)