श्रीमान फडणवीस, तरच तुम्ही महाराष्ट्राचे! शिवसेनेचे आव्हान

मुंबई: छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!,असे आव्हान शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना देण्यात आले आहे.

“हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!”

-Ads-

‘‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत असल्याचे देखील शिवसेनेनं स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)