एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सातारा – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) यंदाही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 2019 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 17 फेब्रुवारीला आणि मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै तर, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती “एमपीएससी’कडून देण्यात आली.

एमपीएससीकडून गेल्या दोन वर्षांपासून साधारण 21 नोव्हेंबरच्या आसपास परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. मात्र, पुढील वर्षी राज्यात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका असल्याने वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले. परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या पदसंख्येबाबतचा तपशील आणि इतर माहिती वेबसाइट व प्रसारमाध्यमांतून जाहीर करण्यात येणार आहे.

“वेळापत्रकामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे,’ अशी माहिती एमपीएससीचे उपसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे. दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्च रोजी होणार असून पेपर क्रमांक एक 28 जुलै तर, पेपर क्रमांक दोन (उपनिरीक्षक) 4 ऑगस्टला, पेपर क्रमांक दोन (कर निरीक्षक) 11 ऑगस्टला आणि पेपर क्रमांक दोन (सहायक कक्ष अधिकारी) 25 ऑगस्टला होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
404 :thumbsup: Thumbs up
155 :heart: Love
70 :joy: Joy
202 :heart_eyes: Awesome
82 :blush: Great
102 :cry: Sad
207 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)