गुन्हेगारी खटले असणारे खासदार

सोळाव्या लोकसभेमध्ये भाजपाच्या 282 पैकी 98 खासदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. संसदेत दुसऱ्या स्थानावर असला तरी गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या खासदारांच्या संख्येत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. कॉंग्रेसच्या 44 पैकी 8 खासदारांवर अशा प्रकारचे खटले नोंदवले गेलेले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर शिवसेना हा पक्ष आहे.

शिवसेनेच्या 18 पैकी 15 खासदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. चौथ्या क्रमांकावर तृणमूल कॉंग्रेस आहे. ममता बॅनर्जींच्या या पक्षाच्या 34 खासदारांपैकी 7 जणांवर गुन्हेगारी खटले दाखल झालेले आहेत. तमिळनाडूतील अण्णा द्रमुक या पक्षाच्या 37 पैकी 6 खासदारांवर असे खटले दाखल असून हा पक्ष पाचव्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)