खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन 

कोल्हापूर – खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले. याप्रसंगी दख्खन केदाराची संपूर्ण माहिती देणारी shreejotibatemple ही वेबसाईट आणि याच नावाने एक मोबाईल ऍपचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सायंकाळी 5:30 च्या सुमारास ते जोतिबा मंदिर परिसरात पोहोचले. यावेळी जोतिबा डोंगरावरील गुरव समाजाने ढोल ताशांच्या गजरात आणि आतिषबाजी च्या कडकडाट त्यांचे जंगी स्वागत केले. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांनी श्‍लोक आणि मंत्र पठण करून त्यांचे राजाच्या स्वरूपातील स्वागत केले. यानंतर त्यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले.

-Ads-

दर्शनानंतर वेबसाईटचे उद्‌घाटन केले. यावेळी त्यांनी मी छत्रपतींचा वारसदार आहे, त्यांच्या प्रतिमेला शोभेल असे कार्य नेहमी करत राहीन, जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांना कसलीही अडचण आली तर मी त्यांच्या सदैव पाठीशी उभा राहीन अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)