खासदार सुळेंनी जनतेशी साधला थेट संवाद

काटी-वडापुरी गटात गावभेट दौरा : नागरिकांच्या दु:खात झाल्या सहभागी
रेडा – इंदापूर तालुक्‍यात खासदार सुप्रिया सुळे यांनी गावभेट दौऱ्यात प्रत्येक गावात जाण्याचा मानस ठेवला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांच्या काटी-वडापुरी गटातील गावांचा दौरा करीत, थेट जनतेच्या अडचणी जाणून घेत, संवाद साधत सामान्य जनतेला आपलेसे केले आहे. गावभेट दौऱ्यात भाटनिमगाव, बेडशिंग, अवसरी, वडापुरी या गावातील लोकांशी थेट गावांत जावून खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, मंगलसिद्धि परिवाराचे प्रमुख अध्यक्ष राजेंद्र तांबिले, बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटिल, कार्यध्यक्ष अमोल भिसे, युवकांचे अध्यक्ष सचिन सपकळ , विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शुभम निबांळकर, पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, महिला अध्यक्ष रहिना मुलाणी, दत्तात्रय शेंडे , साहेबराव मोहिते, जावळे बापू, छगन तांबिले, हनुमंत कोकाटे, सचिन देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

काटी-वडापुरी गटात सुप्रिया सुळे यांनी गोरगरिब, जनतेची आपुलकीने विचारपूस केली. स्त्रीभ्रुणहत्या जनजागृती, महिला आरोग्या, हिमोग्लोबिन तपासणी, महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, कर्णबधिर लोकांसाठी तपासणी, श्रवण यंत्र वाटप, अंपग व्यक्तींसाठी तीनचाकी सायकल वाटप व कृत्रिम अवयव पुरवठा, आर. आर. आबा कॅन्सर मुक्त योजना, त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये शिक्षणाकरीता लाबून येणाऱ्या शाळेतील मुलींना जवळजवळ 3 हजार सायकलींचे वाटप, लहान मुलांच्या हृदय छीद्र बंद शस्रक्रीया करणे अशा प्रकारच्या अनेक विषयां संदर्भातील पुरक योजना सुप्रिया सुळे यांनी राबविल्या आहेत. त्यासंदर्भात अडिअडचणी समजून घेतल्या, तसेच स्थानिक गावातील महिलांच्या समस्या व वयस्कर लोकांच्या समस्या त्यांनी प्रामुख्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

 नागरिकांशी जोडली आपुलकीची नाळ
भाटनिमगाव येथील पंजाब गायकवाड यांच्या घरी एक दु:खद घटना घडल्यामुळे खासदार सुळे त्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर बिडशिंगे येथे बबन रंगनाथ यादव यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांच्या घरी जाऊन घरातील कुटुबांतील लोकांना आधार दिला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ता महेश तिकोटे यांना पक्षघात व मेंदुविकाराची शस्रक्रिया झाल्याचे सुप्रिया सुळे यांना समजाताच त्यांनी तिकोटे यांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. त्यामुळे सामन्य कार्यकर्त्यासह बारामती लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांशी त्यांची आपुलकीची नाळ जोडली गेली असल्याची आधोरेखीत झाले.

काटी-वडापुरी (ता. इंदापूर) : गटात खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदिचे सदस्य अभिजीत तांबिले व मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)