भाजपाचे खासदार किर्ती आझाद कॉंग्रेसच्या वाटेवर

पाटणा : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद लवकरच कॉंगेसमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात 15 फेब्रुवारीला ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.

किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपकडून खासदार आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. किर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डीडीसीएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपने किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर उघडपणे टीका करण्यास सुरूवात केली. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा जाहीरनाम्यात समावेश करुन देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी खेळ केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, किर्ती आझाद बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते भागवत झा आझाद याचे सुपुत्र आहे. आझाद यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. 1983 विश्वविजेता संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सरुवात 1993 मध्ये दिल्लीतील गोल मार्केटतील विधानसभा निवडणुकीतून केली होती. त्यानंतर ते 1998मध्ये बिहारकडे वळाले. तिथे त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. मात्र 1998नंतर त्यांना विजयासाठी 2009 सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)