मध्यप्रदेश पोलीस खात्यात मोठे फेरबदल! २२१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

संग्रहित छायाचित्र.....

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने राज्यभरातील २२१ पोलिसांच्या बदल्या केल्या असून यामध्ये ३४ आयपीएस अधिकारी आणि १८७ राज्य पोलीस सेवा दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मध्यप्रदेश गृह खात्याकडून शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांमध्ये दोन वेगवेगळे अध्यादेश काढण्यात आले असून या द्वारे २२१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस गृहमंडळाचे माजी अध्यक्ष ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय अध्यक्षपदी वर्णी लागल्याने मध्यप्रदेश गृह खात्याकडून १९८५च्या तुकडीतील आयपीएस अधिकरी कृष्णा यांची मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुची वर्धन मिश्रा यांची इंदौरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)