‘गडकरी’जी हनुमानाच्या जातीवर बोलणाऱ्याला कधी फोडून काढणार ?- काँग्रेस

पुणे – नितिन गडकरी हे स्पष्टवक्तेपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. मागील काही काळात गडकरींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काही विधाने केली. या विधानावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता काल पुणे येथे गडकरीं यांनी एक वक्तव्य केलं, त्या विधानावरून काँग्रेसने पुन्हा एकदा गडकरींना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, “माझ्या मतदारसंघात जातीयवादाला अजिबात थारा नाही. जातीयवादावर बोलणाऱ्याला मी फोडून काढेन”, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी-चिंचवडमधील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमतर्फे काल आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

जातीचे नाव काढणाऱ्यांना ठोकून काढेन : गडकरी

त्या विधानाला अनुसरून मध्यप्रदेश काँग्रेसने गडकरींना लक्ष्य करत म्हटले आहे की, “गडकरी यांनी पुन्हा एकदा मोदी आणि भाजपावर सरळ निशाना साधला आहे”. काँग्रेसने म्हटले आहे की, ‘भाजपाचे नेते गडकरी यांनी स्वत:च भाजपाच्या मूळ राजनिती विरोधात वक्तव्य केले आहे. जातीयवादावर बोलणाऱ्याला मी फोडून काढेन, असे ते म्हणाले. पण..गडकरीजी ! तुम्ही हे पण सांगा की, ‘हनुमानाच्या जातीवर बोलून मतं मागणाऱ्यांना तुम्ही कधी फोडून काढणार ?

 

दरम्यान राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक भाजप नेत्यांनी हनुमानाच्या जातीसंबंधी अनेक विधानं केली होती.

आता सत्यपालसिंह म्हणतात ‘हनुमान’ आर्य

…म्हणून हनुमान जाट होते – भाजप मंत्री

हनुमान हे खेळाडू होते; भाजप मंत्र्यांचा दावा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)