चित्रपट – “कबीर सिंग’च्या दोन्ही बाजू पाहाव्यात

शिल्पा देशपांडे

चित्रपटातील विश्‍व आणि वास्तव यातील अंतर कमी होत चालले आहे. मात्र, त्याचवेळी चित्रपट हा चित्रपट म्हणूनच पाहायला हवा, हेही तितकेच आवश्‍यक. व्यसनी, आक्रमक मात्र हुशार, निष्णात “कबीर’कडेही डोळसपणेच पाहिले जावे.

माध्यमांमध्ये दृक्‌श्राव्य माध्यम जास्त प्रभावशाली आहे त्यामुळे त्याचा थेट आणि जलद परिणाम जनमानसावर होत असतो त्यात भारतीय चित्रपटसृष्टी ही सगळ्यात विस्तारित आणि प्रभावी ठरते. चित्रपटांचा थेट आणि जलद परिणाम तरुण पिढीवर पडत असतो. कधी कधी वास्तव आणि मोठा पडदा यामधील अंतर संपुष्टात येऊन मोठ्या पडद्यावरील कलाकारांचे हुबेहूब अनुकरण करणारी एक प्रेक्षक वर्गाची फळी तयार होत असते अशा वेळी चित्रपट निर्माता, दिग्दर्शकांनी सामाजिक जबाबदारीचे भानही ठेवणे हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्‍यक ठरते .

“कबीर सिंग’ हा चित्रपट सध्या वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय बॉक्‍स ऑफिसवरची त्याची कमाई ही गोष्ट गौण ठरून शाहीद कपूरने साकारलेली व्यक्‍तिरेखा ही चर्चेचा विषय बनत आहे, ही व्यक्‍तिरेखा भडकपणे साकारताना कुठंतरी तरुण मनाच्या स्वास्थ्याला तडा जाऊ शकतो .कबीर जो एक डॉक्‍टर आणि निष्णात सर्जन आहे पण केवळ प्रेमभंगाच्या विफलतेतून आलेले नैराश्‍य आणि त्यातून दारू आणि अंमलीपदार्थांच्या आहारी जाऊन केलेला आक्रस्ताळेपणा आणि भडकी विकृतीमध्ये कुठेतरी शिंपडलेली प्रेमाची उत्कटता दाखवताना विकृत आणि नशेचे अवास्तव समर्थीकरण हे वैधानिक इशारा दाखवून कमी होत नसते याचे भान दिग्दर्शकाने ठेवणे गरजेचे असते मूळ सिनेमा तेलगू आहे त्याचा हा रिमेक आहे मूळ सिनेमाची प्रवृत्ती, प्रकृती न बदलता आहें तसा हिंदी चित्रपट बनवला गेला आणि तेलगू चित्रपटात हिंसा, प्रसंग तसेच राजकारण फार भडकपणे दाखवितात तो प्रेक्षक वर्गही तसाच आहे पण हाच रिमेक हिंदी मध्ये आहे तास घेतल्याने उलट सुलट चर्चा होत आहे, कारण हिंदी प्रेक्षक वर्गाला थोडा हळवा, कौटुंबिक किंवा सौम्य मोठा पडदा सवयीचा आहे त्यात थोडासा भडकपणा आला.

अर्थात चित्रपटात प्रेमातील प्रसंग, प्रेयसीची अतीव काळजी घेणारा कबीर प्रेक्षकांना सुखावून जातोच पण प्रेमातील विफलता आणि त्यातून तो नशेच्या अधीन जाणे किंवा रागावर नियंत्रण नसलेला कबीर, सतत दारू आणि अमलीपदार्थांचा चित्रपटात वावर कधी कधी अंगावर आल्यासारखा वाटतो तसेच त्याची प्रीती त्याची प्रेयसी सोडून इतर स्त्रीविषयक त्याची वर्तणूक विकृत मानसिकता दर्शवणारी वाटते. स्त्रीवादी अभ्यासक अंजली कुलकर्णी म्हणतात, समाजामध्ये असे कबीर असतातच कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांना कमी लेखणे, मग वेगवेगळ्या पद्धतीने का होईना स्त्री आणि मुक्‍त वगैरे पोहोचलेली नाही आहे, कबीर या व्यक्‍तिरेखेचा राग नियंत्रण न होणे, याला समाजामध्ये पुरुष या नावाखाली समर्थीकरण केले जाते. पुरुष आहे म्हणून त्याच्या काही सवयी आणि दोषमुक्‍त स्वीकारले जातात.

चित्रपट कथानकाचे हिंदीकरण झाले नाही. जर असे झाले असते तर कदाचित चित्रपट सौम्य झाला असता आणि चित्रपट निर्मात्यांपेक्षा सेन्सॉरची जबाबदारी जास्त आहे कि काय गाळून चित्रपट प्रदर्शनास परवानगी द्यावी आणि नेटफ्लिक्‍स किंवा इतरवेबसाइटवरुन थेट चित्रपट सहजासहजी हात उपलब्ध होत असतो. त्यामुळे जास्त सामाजिक भान असणे गरजेचे आहे असे चित्रपट विश्‍लेषक दिलीप ठाकूर म्हणतात.

कथानक अगदी साचेबद्ध असले तरी दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय यामुळे सुसह्य होतो, कबीर हा डॉक्‍टर असून प्रीती नावाच्या त्याच्याच मेडिकल कॉलेजमधील मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग तिच्या वडिलांकडून विरोध वगैरे असे साचेबद्ध कथानक असून फक्‍त व्यक्‍तिरेखा वेगळी साकारली गेली. प्रेमात विफलता आली तर बरेच जण दारूच्या आहारी जातात, तसेच रागावर नियंत्रण नसणे ही 28 ते 32 या वयोगट यामध्ये तीव्र 8असते, तसेच कबीर या व्यक्‍तिरेखेसारखे जे शैक्षणिक प्रगत असतात, सधन, प्रतिष्ठित असूनही आलेल्या प्रसंगाला हाताळता न येण्यामुळे हिसंक किंवा विकृतीचा आधार घेऊन स्वतःमधील कमतरता किंवा अहं सांभाळत असतात. मानसिक असंतुलन, भावनिक उद्रेक मग नशेच्या आधाराने कमी करण्याचा प्रयत्न अशी माणसे करतात असे सांगताना डॉ. ऊर्जिता कुलकर्णी समाजातील वाढणारी व्यसनाधीनता आता 20 -21 वयोगटापासूनच येत आहे हि चिंतेची बाब आहेड़

कबीर सिंग हा चित्रपट फक्‍त चित्रपट म्हणूनच घेतला तर त्यातून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू दिसतील, त्याचबरोबर सुखद प्रेमाचे प्रसंग आणि कबीरच्या मित्रांनी शेवटपर्यंत त्याची न सोडलेली साथ दिलासा देऊन जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)