#MovieReview:गोंधळात टाकणारा ‘विश्वरूपम 2’

अभिनेता, दिग्दर्शक कमल हासन लिखित आणि दिग्दर्शित ‘विश्वरूपम2 हा चित्रपट 2013 साली आलेल्या ‘विश्वरूपम’ चा सिक्वेल आहे. पहिल्या भागा मुळे या सिक्वेल कड़े सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र  ऐक्शनचा तडका असलेला हा चित्रपट कमकुवत पटकथेमुळे प्रेक्षकांच्या मनाला भीडत नाही.
‘विश्वरूपम2’ ची कथा सुरू होते, ती चित्रपटाचा पहिला भाग  संपतो तिथून. अमेरिकास्थित अतिरेकी उमरच्या कचाट्यातून निसटून रॉ एजंट विशाम अहमद काश्मिरी (कमल हासन) त्याची सहकारी अश्मिता (ऐंड्रिया जेरमिया), पत्नी निरूपमा (पूजा कुमार) आणि कर्नल (शेखर कपूर) हे सगळे ब्रिटनला पोहोचतात. पण इथे पोहोचल्या पोहोचल्या उमरचे लोक इथेही सक्रिय असल्याचे आणि आपल्या जीवांना धोका असल्याचे त्यांना कळते, विशाम हा इतकी वर्षे अमेरिकेत डान्स टीचरच्या वेशात अल-कायदाच्या स्लीपर सेल्सची पाळेमुळे खणत असतो, हे निरुपमाला ठाऊक नसते.
आपला नवरा मुळातचं एक मुस्लिम आहे आणि त्याला आपला प्रियकर बॉस दीपंकरबद्दल सगळे काही माहित आहे, हेही तिला नंतरचं कळते. एकदिवस अचानक प्रियकरामुळे ती धोक्यात येते आणि नवरा अर्थात विशाम तिला वाचवायला पोहोचतो. यावेळी त्याचे ‘माचो रूप’ ती पहिल्यांदाचं बघते. नवऱ्याबद्दलच्या अनेक  गोष्टी तिला समजतात, तो अफगाणिस्तानात कसा पोहोचला, तिथे त्याने काय शौर्य गाजवले, हे तिला कळते आणि आपला नवरा एक खरा देशभक्त आहे, याची तिला खात्री पटते.
पण ब्रिटनमधून नवी दिल्लीला पोहोचेपर्यंत त्यांच्यावर इतके प्राणघातक हल्ले होतात की, नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची संधीचं तिला मिळत नाही. इकडे विशामचा पिच्छा पुरवत उमर नवी दिल्लीत येऊन पोहोचतो आणि अख्खी दिल्ली बेचिराख करण्यासाठी ठिकठिकाणी ६४ बॉम्ब पेरतो. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ‘विश्वरूपम2’ बघायला हवा.
अभिनेता , दिग्दर्शक कमल हासन यांचा चित्रपट म्हटले की अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात त्या म्हणजे एक उत्तम कलाकृती बघायला मिळेल असा विश्वास सामान्य प्रेक्षाकाला असतो यावेळी मात्र त्याच्या पदरी नक्कीच निराशा येणार आहे. सततची अ‍ॅक्शन आणि सोबतीला तितकेच कर्कश पार्श्वसंगीत यामुळे प्रेक्षक  आता बास असे म्हणतो.
कारण कथेत अनेक निरर्थक वळणे येतात. या वळणांवर कथेतील पात्र कुठूनही कसेही कथेत शिरकाव करताना दिसतात, कुठून कसेही अचानक बाहेर पडतात, कथेत काहीच तारतम्य दिसत नाही, तसेच काही वेळा हा सिक्वेल आहे की प्रिक्वेल असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो.
कलकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर कमल हासन सबकुछ असा हा चित्रपट आहे. कमल हासन वगळता शेखर कपूर, राहुल बोस  आणि इतर कलाकार निराश करतात. वहीदा रहमान यांचा एक सीन लक्षात राहणारा आहे.
‘विश्वरूपम 2’ बद्दल थोडक्यात सांगायचे तर पहिला भाग चांगला होता मात्र हा सिक्वेल कमकुवत पटकथा आणि बेसुमार ऐक्शनच्या भडीमारामुळे निराश करतो, तुम्ही कमल हासनचे चाहते असाल तर एकदा बघायला हरकत नाही.
चित्रपट – विश्वरूपम 2 
निर्माता – कमल हासन, वेणु रविचंद्रन, चंद्रा हासन
दिग्दर्शक – कमल हासन
कलाकर – कमल हासन, राहुल बोस, शेखर कपूर, पूजा कुमार, वहीदा रेहमान, जयदीप अहलावत
– भूपाल पंडित

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)