MovieReview: कनफ़्युज असलेल ’ती अँड ती’ 

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर ‘ती अ‍ॅण्ड ती’ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘ती अ‍ॅण्ड ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णीने यांनी केले आहे. यापूर्वी ‘रमा माधव’ आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असे वेगळे चित्रपट दिले आहेत, तर सोनाली कुलकर्णी ’हंपी’ नंतर सुमारे वर्ष – दिड वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आली आहे, तसेच पुष्कर जोग सुद्धा बऱ्याच दिवसांनी आला आहे  त्यामुळे या चित्रपटाबद्दल काहीसी उत्सुकता होती मात्र हा चित्रपट  प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात कमी पडला आहे.

‘ती  अँड ती ‘ ही  कथा पुण्यातील अनय पंडित ( पुष्कर जोग ) भो वती गुंफण्यात आली आहे,  त्याच्यावर रोमँटिक हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे, त्याला प्रेम विवाह करायचा आहे, मात्र प्रत्यक्षात त्याचे अरेंज मॅरेज झाले आहे, सई (प्रार्थना बेहेरे)  त्याची पत्नी आहे,  पण त्याच्या डोक्यात अजूनही त्याचे बालपणीचे पहिले प्रेम म्हणजे प्रियंका (सोनाली कुलकर्णी ) आहे. दरम्यान लग्नानंतर अनय आणि सई  लंडनला हनिमूनला जातात तिथे विमानतळावर अचानक अनय  आणि प्रियांकाची भेट होते. आता ती फारच स्वच्छंदी जीवन जगत आहे. शालेय शिक्षण घेत असताना अनय तिच्या प्रेमात पडलेला असतो. लव अ‍ॅट फस्ट साईट म्हणावे तसा तो पुन्हा ती आपल्या जीवनात यावी यासाठी तिचा पाठपुरावा करत असतो. आपले लग्न झालेले नाही हे प्रियाला दाखवायचे असते तर पत्नी सईला अंधारात ठेवून पहिले प्रेम परत मिळवायचे असते. या सार्‍या गोष्टी करताना अनयची होणारी कसरत या चित्रपटात बघायला मिळते.

दिग्दर्शिका म्रुणाल कुलकर्णी यांनी दिलेल्या यापुर्वीच्या चित्रपटापेक्षा ’ ती अँड ती’चा बाज थोडासा वेगळा आहे. त्यांचा मुलगा विराजस याने या चित्रपटाची कथा लिहिली आहे, कथेत फ़ारसे नाविन्य नाही याची कल्पना आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलर वरुन आलेली आहे, तरीही किमान मांडणीत नाविन्य असेल अशी अपेक्षा होती ती पुर्ण होत नाही. पटकथा आणि संवाद काहीसे खुमासदार असायला हवे होते, यात जी नात्याची गुंफ़ण आहे ती  भावनीक पातळीवर जाणवली असती तर चित्रपट प्रभावी ठरला असता. मध्यंतरा नंतर कथेत ट्विस्ट आणि वेग असला तरी पुर्वाध संथ आहे.
कलाकरांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर पुष्कर जोग याने अनयची  व्यक्तीरेखा उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला आहे, साकार केलेली आहे. सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे यांच्या भुमिका चांगल्या झाल्या आहेत मात्र त्यांच्याकडुन अधिक चांगल्या अभिनयाची नक्कीच अपेक्षा आहे, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर कलाकारांनी आपल्या भुमिकांना योग्य न्याय दिला आहे.

साई-पियूष यांनी कथेला साजेल असे संगीत दिलेले आहे. चित्रपट एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे चकचकीत आहे, लोकेशन्स, चित्रीकरण सुंदर आहे, तांत्रिक बाजुंनी चित्रपट भक्कम असला तरी नाविन्याचा अभाव ही मोठी उणिव ती अँड ती  मध्ये आहे.

चित्रपट – ती अँड ती
निर्मिती – विशाल शाह, पुष्कर जोग, मोहन नादार
दिग्दर्शक – मृणाल कुलकर्णी
संगीत – साई पियुष
कलाकार – पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिद्धार्थ चांदेकर
रेटींग – २.५

– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)