#Moviereview: सुंदर ‘कारवाँ’

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटातून प्रवास हा विषय हाताळला गेला आहे. जीवनातल्या अनपेक्षित प्रवासाची एक आगळी वेगळी कथा दिग्दर्शक आकर्ष खुराणा घेउन आले आहेत. अभिनेता इरफान खान, दुलकेर सलमान आणि वेबक्वीन मिथीला पालकरची प्रमुख भूमिका असलेला ‘कारवाँ’ म्हणजे आपल्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात अलगत येणारी एक सुखाची झुळूक आहे.
‘कारवाँ’ ही कथा आहे अविनाश (दुलकेर सलमान),शौकत (इरफान खान) आणि तान्या (मिथीला पालकर) यांच्या आयुष्याची. फोटोग्राफर होण्याचं स्वप्न बाळगणारा अविनाश वडिलांच्या हट्टापायी आपल्या स्वप्नांना तिलांजली देतो आणि वडिलांशी असलेलं त्याचं नात कायमचं तुटतं. आपल्या स्वप्नांचे पंख वडिलांनी छाटले हा राग कायम अविनाशच्या मनात आहे, वडिलांच्या हट्टामुळे आयटी कंपनीत तो नोकरी स्वीकारतो. तर आयुष्य मनमुराद जगणारा इसम आणि अविनाशचा जिवलग मित्र.
आयुष्य म्हणजे स्वच्छंदी जगणं, प्रत्येक गोष्टीकडे प्रँक्टीकली पाहणं पण त्याचवेळी त्यातल्या भावनिक गुंताही तितक्याच सहजतेनं समजून घेणं असं शौकतचं व्यक्तिमत्त्व. दरम्यान, अविनाशच्या वडिलांचंयात्रेच्या प्रवासात अकस्मिक निधन होतं. ट्रॅव्हल कंपनीत्याच्या वडिलांचा मृतदेह पाठवते मात्र मध्येच एक घोळ होतो अन् अविनाशच्या वडिलांचा मृतदेह दुसऱ्याच ठिकाणी पाठवला जातो. हा मृतदेह कोच्चीहून बंगळूरुला आणण्यासाठी अविनाश शौकतची मदत घेतो. पुढे या दोघांच्या प्रवासात तान्याची एन्ट्री होते.
ती स्वत:च्या विश्वात रमलेली फोन पलिकडे दुसरं जग अस्तित्त्वात असतं या वास्तवापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली मुलगी आहे, या तीन भिन्न स्वभावाच्या माणासांना नशीब एकत्र घेऊन येतं, या  प्रवासातत्यांच्यावर  संकटं येतात तसेच सुखाचे क्षणही येतात. या तिघांचा प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ‘कारवाँ’ मोठ्या पडद्यावरच बघायला हवा.
दिग्दर्शक आकर्ष खुराणाचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुव्वात काहीशी मंद  असल्या सारखे वाटते, मात्र जसजशी ही कथा पुढे सरकते तशी ती आपलीशी वाटू लागते. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करू लागते. नात्यामधील उतार चढाव, पिढ्या मधील विसंवाद, अपेक्षांचं ओझ या भोवती फिरत जाणारा, अनपेक्षितपणे तिघांचा घडणार एकत्रित प्रवास दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने मांडला आहे.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर इरफानखानने साकारलेला शौकत मनाला भावतो. काहीसा आगावू पण तितकाच सज्जन आणि प्रेमळ असे आपल्या व्यक्तिरेखेच्या स्वभावाचे तिन्ही पैलू इरफान अगदी सहज-सुंदर आणि विनोदी शैलीने उलगडतो.दुलकर सलमानने आपली संवेदनशील आणि शांत व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे उभी केली आहे. मिथीला पालकरची तान्या लक्षात राहते.
‘कारवाँ’ ची कथा थोडीशी काल्पन्निक वाटते, कारण सामान्य माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर चित्रपटात ज्या घटना घडतात त्या परिस्थितीत त्याची प्रतिक्रिया वेगळी असेल हे स्पष्ट आहे, काल्पनीक्त वगळता हा प्रवास सुखकर आहे हे निश्चित. चित्रपटातील गाणी विशेष नाहीत, डीओपी अविनाश अरुणने उत्तम चित्रीकरण करत केरळ ची सफर घडविली आहे.
चित्रपट – कारवाँ
निर्मिती – रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक – आकर्ष खुराणा
संगीत – प्रतिक खुदाः, अनुराग शाक्य, इमाद शहा
कलाकार – इरफान खान, दुलकेर सलमान, मिथीला पालकर, आकाश खुराणा, कृती खरवंदा
रेटिंग – 3.5
-भूपाल पंडित

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)