MovieReview : एका आनंदयात्रीचा प्रवास (उत्तरार्ध)

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर अधरीत ’भाई- व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा पूर्वार्ध ४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला, त्यामध्ये पुलंचे शालेय,महाविद्यालयीन शिक्षण,विवाह असा प्रवास, नाट्यकलेत स्वत:ला आजमावत असताना दिग्गज गायकांचा लाभलेला सहवास असा कालखंड होता. उत्तरार्धात नाटककार ते अगदी अंतिम श्वास घेईपर्यंतच्या काळाचा वेध घेण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर ‘भाई- व्यक्ती की वल्ली’च्या पूर्वार्धाचा शेवट कुमार गंधर्व,भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे आणि पेटीवर दस्तुरखुद्द पुलं यांच्या त्या सुरेल मैफिलीने होतो. उत्तरार्धात भाईंच्या दूरदर्शनाच्या कामापासून त्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि मराठी रंगभूमीवर बटाट्याची चाळ साकारण्यापासून अद्भुत अशी मराठी नाटकं रसिकप्रेक्षकांना देण्याचा काळ झरझरपणे सरकत जातो.

या प्रवासात सुनिताबाईंनी भाईंना दिलेली साथ आणि त्याचवेळी रसिकांच्या मनावर राज्य करणारे भाई , आनंदवन,मुक्तांगण अश्या समाजपोयोगी गोष्टींना सढळ हस्ताने मदत करणारे भाई, आणि आणीबाणीच्या काळात न डगमगता विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे भाई हे कित्येक पैलू सिनेमात एकामागोमाग एक येत असतात. पु.लंचं गाजलेलं एकपात्री ‘बटाट्याची चाळ’ हे नाटक. त्यानंतर भक्ती बर्वेची मुख्य भूमिका असलेलं ती फुलराणी हे नाटक असा सगळा प्रवास पटापट पडद्यावर पुढे सरकत जातो. दत्तराम, अनिल अवचट,भक्ती बर्वे, विजया मेहता, बाबा आमटे,साधना आमटे, आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे अशी अनेक पात्र या प्रवासात भेटतात. या दरम्यान मराठी रसिकांच्या मनात भाई या नावाची मोहोर उमटलेली असते. या काळात भाईला मिळालेली सुनीताबाईंची साथ सहजीवनाचा पैलू समोर आणते.  पूर्वाधापेक्षा  उत्तरार्ध जास्त रंजक आणि वेगवान वाटतो.

चित्रपटाचा विषय संपुर्ण महाराष्ट्राच्या अगदी जवळचा आहे, यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या कडुन मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या पुर्ण होत नाहीत. कमकुवत पटकथा,सलगतेचा अभाव यामुळे दोन्ही भाग दिग्दर्शकाला सक्षमपणे उभे करण्यात अपयश आले आहे. उत्तरार्धात पुन्हा एकदा वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी या दिग्गजांची मैफील अनुभवायला मिळते, नाटक, आकाशवाणी, दुरदर्शन यातील भाई भेटतात पण लेखक पु.ल.देशपांडे इथेही सापडत नाहीत.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर पुलंची भूमिका साकारणारा सागर देशमुख आणि सुनीताबाईंच्या भूमिकेत असणारी इरावती हर्षे यांनी आपल्या व्यक्तीरेखा उत्तम साकारल्या आहेत,  उत्तरार्धात विजय केंकरे आणि शुभांगी दामले यांनी साकारलेले भाई आणि सुनीताबाई परफ़ेक्ट बसले आहेत. उत्तरार्धात येणार्‍या अनेक पात्रांमध्ये नीना कुलकर्णी यांनी साकारलेल्या विजया मेहता, सारंग साठे याने उभे केलेले बाळासाहेब ठाकरे, संजय खापरे याने साकारलेली बाबा आमटे यांच्या भूमिका लक्षवेधुन घेतात.

पुर्वार्धा प्रमाणेच अजित परब यांचे संगीत ही उत्तरार्धातही जमेची बाजु आहे. पु.ल. देशपांडे यांनी आनंदवनात केलेल्या ‘नाच रे मोरा’ या कार्यक्रमामुळे कथेत रंग भरले गेले आहेत.

एकंदरीत साण्गायचे तर  आपल्याला पुलं माहित असले तरी हा चित्रपट आपल्याला त्यांची पुर्नभेट घदवतो, मात्र ती अपुर्ण असल्याचे जाणवते. एका आनंदयात्रीचा प्रवास जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट पाहु शकता.

 

चित्रपट – भाई व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

निर्मिती – वायकॊम १८, महेश मांजरेकर

दिग्दर्शक –  महेश वामन मांजरेकर

संगीत – अजित परब

कलाकार – सागर देशमुख, इरावती हर्षे,विजय केंकरे,शुभांगी दामले, गिरिश कुलकर्णी, निना कुलकर्णी, सारंग साठ्ये

रेटींग – २.५

–     भूपाल पंडित

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)