#MovieReview: सर्वसाधारण ‘गोल्ड’

ब्रिटीश राजवटीतून भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर एक वर्षाने झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक मिळविले, तत्पुर्वी १९३६ साली ऑलम्पिक स्पर्धा झाल्या होत्या, या १२ वर्षाच्या काळात जागतिक पातळीवर अनेक सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे झाली त्यातील सर्वात महत्वाचे भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्या नंतर पहिले सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय हॉकी संघाची वास्तवावर आधारीत काल्पनिक कथा दिग्दर्शिका रीमा कागती यांनी ‘गोल्ड’ मधून प्रेक्षकांसमोर आणली आहे.
‘गोल्ड’ ही खेळाडूची नव्हे तर 1948 सालच्या भारतीय हॉकी टीमचा मॅनेजर तपन दास (अक्षय कुमार) याच्याभोवती फिरणारी कथा आहे. या कथेची सुरुवात 1936 च्या ऑलम्पिक हॉकी मॅचने होते. भारत पारतंत्र्यात असल्याने ब्रिटीश टीम इंडिया मैदानावर खेळत असते आणि तपन दास याच ब्रिटीश टीम इंडियाचा मॅनेजर आहे, भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक मिळवतो. पण या विजयाचे सगळे श्रेय ब्रिटीश इंडियाला दिले जाते. त्याच क्षणी पुढचे सुवर्णपदक स्वतंत्र भारताला मिळवून द्यायचे, असा निर्धार तपन दास करतो.
पण जागतिक महायुद्धामुळे दोन ऑलिंपिक रद्द केले जातात. याचकाळात तपन दास दारूच्या व्यसनात बुडतो, दरम्यान १९४६ साली पुढची ऑलिंपिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये होणार, असे जाहिर होते या बातमीने तपन दासला आपली स्वप्नपुर्ती होण्याची आस निर्माण होते, हॉकी फेडरेशनचे प्रमुख त्याच्यावर विश्वास दाखवतात आणि तपन दास कामाला लागतो. तपणदासची हॉकी टीम तयार होते. भारतही स्वतंत्र होतो. पण देशाची फाळणी होते आणि काही खेळाडू पाकिस्तानात जातात, मग पुन्हा तपन दासचा शोध सुरु होतो, अनंत अडचणीचा सामना करत भारततीय हॉकी टीम ‘गोल्ड’ कसे जिंकते हे चित्रपटातच बघायला हवे.
दिग्दर्शिका रीमा कागती यांनी एकोणीसशे चाळीसच्या दशकाचा काळ निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे, पण कथेत अनेक ठिकाणी उणीवा असल्याचे स्पष्ट दिसते. भारतीय हॉकी टीमच्या खेळापेक्षा इतर अनेक गोष्टींचा आणि घटनांचा यात आढावा घेतल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. देशाभिमान आणि भारतीय ऐक्यावर हा चित्रपट संदेश देतो, पण हा संदेश अतिशय वरवरचा वाटतो, तसेच ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट आपल्याला वारंवार आठवतो हे दिग्दर्शिकेचे अपयश आहे.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अक्षय कुमारने साकारलेला बंगाली तपन दास चांगला झाला आहे, अक्षय त्याच्या चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करतो मात्र त्याच्यापेक्षा लास्खात राहतो तो सनी कौशलची व्यक्तीरेखा हिम्मत सिंग आणि मुक्काबाज फेम विनीत कुमार, कुणाल कपूर, अमित साध यांच्या भूमिकाही लक्षवेधी आहेत. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आलेली मौनी रॉय आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली आहे.
‘हनिमून ट्रॅव्हल  या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या ‘रिमा कागती यांच्याकडून एका चांगल्या चित्रपटाची अपेक्षा होती. मात्र त्यांनी ‘तलाश’ नंतर सलग दुसऱ्यावेळी निराशा केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकंदरीत सांगायचे तर तुम्ही हॉकी किंवा अक्षय कुमारचे चाहते असाल तर ‘गोल्ड’ तुमच्यासाठी आहे, मात्र एक स्पोर्ट चित्रपट म्हणून हा चित्रपट निराश करतो.
चित्रपट – गोल्ड 
निर्मिती – फरहान अख्तर, रितेश सिधावानी
दिग्दर्शक – रीमा कागती
संगीत – सचिन – जिगर 
कलाकार – अक्षयकुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत कुमार, सनी कौशल, निकिता दत्ता, दलीप ताहिल
रेटिंग – 2.5
– भूपाल पंडित 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)