MovieReview : भावनिक ‘नाळ’

दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांचा ‘नाळ’ हा तुमच्या रोजच्या जिवनात घडणारी ग्रामीण टच असणारी गोष्ट आहे. ‘फॅड्री’, ‘सैराट’ नंतर नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे, मात्र एका नव्या भूमिकेत ते आपल्या समोर आले आहेत, ते म्हणजे अभिनेता.

विदर्भातील एका छोट्याशा गावात घडणारी हि गोष्ट आहे. नदी काठी वसलेलं हे गाव जीथे दळणवळणाची साधनही फारशी नाहीत चैत्या (श्रीनिवास पोकळे) या लहान मुलाच्या भावविश्वावर आधारलेला हा सिनेमा आहे. त्याचे वडिल (नागराज मंजुळे), आई(देविका दफ्तरदार) यांच्या सोबत तो गावात राहत असतो. गावातल्या मुलांबरोबर दिवसभर नदीकाठी हुंदडणे,नगी पोहयला जाणे, कोंबड्यांच्या मागे फिरणे, गोठ्यात म्हशीसोबत खेळणे आणि गावापासून थोडं लांब असणार्याा इंग्रजी शाळेत जाणे असा दिनक्रमच चैत्याचा असतो. चैत्याबरोबरच प्रेक्षही हा ग्रामीण जीवन मनोसोक्त जगतात. पण एकदिवशी गावात चैतन्यचा मामा (ओम भुतकर) येतो आणि चैतन्यचं आयुष्यच बदलतं. चैतन्यला मामा बोलता बोलता ही तूझी खरी आई नाही तर यांनी तुला दत्तक घेतलय असं सांगतो, आणि चैतन्यचा खर्याल आईचा शोध सुरू होतो आणि हा चित्रपट एका वेगळ्या वळणावर जायला लागतो.

-Ads-

सुधाकर रेड्डी यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. आई आणि मुलाच्या नात्यातला ओलावा दाखवणारा हा सिनेमा थोडा मनोरंजक, थोडा गंभीर अशा स्वरुपाचा आहे. आपले आई-वडिल दुसरेच कोणीतरी आहेत हे कळण्यापूर्वीचा चैतन्य आणि ते समजल्यानंतरचा चैतन्य, त्या लहान पोराच्या मनातील घालमेल दिग्दर्शकाने अतिशय संयत पद्धतीने मांडली आहे. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संवाद देखील चांगले आहेत.

चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी अतिशय सहजपणे अभिनय केला आहे. हा संपूर्ण चित्रपट पाहताना प्रेक्षकांचं मन जिंकतो तो चैतन्य. त्याचा निरागसपणा, त्याची भाषा, त्याचे हावभाव याच्या जिवावर तो बाजी मारुन नेतो. नागराज मंजुळे आणि देविका, सेवा चव्हाण. ओम भूतकर यांच्यासह इतर कलाकारांच्या भुमिकाही छान झाल्यात पण सिनेमातून बाहेर पडल्यावर लक्षात राहतो तो फक्त चैतन्यच.

चित्रपाटचं संगीत हे चित्रपटाची जमेची बाजू आहे. ‘जाऊ दे ना वं..’ हे चित्रपटातील गोड गाणं तुमच्या कायम रेंगाळतं. त्याचबरोबर चित्रपटाचं पार्श्वसंगीतही उत्तम जमून आलं आहे. मध्यंतरा आधी चित्रपटपुर्णपणे प्रेक्षकांची पकड घेतो. मध्यंतरानंतर चित्रपट थोडा रंगाळतो पण चित्रपटाचा शेवटचा भाग पुन्हा एकदा तुमची मनं जिकंतो.

नाळ हा तुमच्या रोजच्या जिवनात घडणारी ग्रामीण टच असणारी गोष्ट आहे. सिनेमातील अनेक गोष्टी या लेखकाने प्रेक्षकांवर सोडल्या आहेत. ही एका लहानग्याची गोष्ट असली तरी मोठ्यानाही तितकच शिकवून जाते. प्रेक्षकांशी चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून जोडली गेलेली नाळ तुटणार नाही याची खबरदारी दिग्दर्शकाने घेतली आहे. त्यामुळे त्याला साजेल असाच चित्रपटाचा शेवट आहे. भावनिक नाळ एकदा बघायला हवा.

चित्रपट – नाळ

निर्मिती – आटपाट, झी स्टुडीओ

दिग्दर्शक –  सुधाकर रेड्डी यंकट्टी

संगीत – ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

कलाकार  –  नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण ,ओम भूतकर, श्रीनिवास पोकळे, दीप्ती देवी

रेटिंग – ***

भूपाल पंडित

What is your reaction?
8 :thumbsup:
105 :heart:
9 :joy:
8 :heart_eyes:
7 :blush:
6 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)