आरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली 

पंतप्रधान व पटेल यांची चर्चा : उद्योगांना पुरेसे भांडवल मिळण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली  – केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं व रिझर्व्ह बकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची चर्चा झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर 19 नोव्हेंबरच्या आरबीआयच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

या भेटीत दोघांचेही एका तोडग्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. या तोडग्यानुसार केंद्र सरकार आरबीआयकडून पैसे मागण्यासंदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे, तर आरबीआयही केंद्राला कर्ज देण्यात थोडी सूट देणार आहे.

कमी भांडवल आणि बॅंकांनी भरमसाट दिलेल्या कर्जाच्या समस्यांमुळे आरबीआयने बॅंकांवर कर्ज देण्यासंदर्भात काही बंधने घातली होती. ज्या बॅंकांनी भरमसाट कर्जे वाटप केली, त्या 11 बॅंकांवर कर्ज देण्यासंदर्भात मर्यादा घातल्या होत्या.
आरबीआय काही बॅंकांना करेक्‍टिव एक्‍शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर काढणार आहे. जेणेकरून बॅंक अधिक कर्ज देऊ शकेल.

ज्या बॅंका स्वतःचं भाग भांडवल वाढत नाहीत. त्या बऱ्याचदा तोट्यात जातात. केंद्र सरकार आणि आरबीआयचे काही बॅंकांना पीसीएतून बाहेर ठेवण्यावर सहमती झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पदावरून दूर करणार नाही, असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले होते. सरकार आणि केंद्रीय बॅंकेत मतभेद होणे ही काही नवी बाब नाही. यापूर्वीच्या अनेक सरकारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

ऊर्जित पटेल यांचा कार्यकाळ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपत आहे. ते तो पूर्ण करतील. सुमारे 10 दिवसांपूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील तणावाला प्रारंभ झाला होता. आरबीआय कायद्याच्या कलम 7 अन्वये सरकारने रिझर्व्ह बॅंकेसोबत औपचारिक चर्चा करण्याचे प्रस्तावित केल्यामुळे पटेल हे राजीनामा देतील, अशीही शक्‍यता वर्तवण्यात येत होती . त्यामुळे खळबळ उडाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)