पुणे – खुला रिक्षा परवाना बंद करण्यात यावा, रिक्षा भाडे दरवाढ करण्यात यावी, ओला आणि उबेर सारख्या मोटार कॅबवर बंदी घालण्यात यावी आदी मागण्यांसाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर निदर्शने करत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर पंचायतीच्या वतीने (दि ९ रोजी) पुकारण्यात येणाऱ्या बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सरचिटणीस नितीन पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांसह रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
शहर पातळीवर निर्णय लवकरात लवकर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात येणार आहेत, अशी ग्वाही प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली