मॉडर्न महाविद्यालयात अभाविप चे आंदोलन

पुणे: मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड पुणे च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अनेक समस्या भेडसावत आहेत, तसेच महाविद्यालयाने व्होकेशनल कोर्स चा निकाल अध्यापही लावलेला नाही, सदर विषयात आज अभाविप व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज प्रचार्यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले.
मॉडर्न महाविद्यालयातील B Voc इन फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून ठरवून त्रास दिला जातो तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा महाविद्यालायकडून पुरवली जात नाही. सदर कोर्स हा UGC ने गोर गरीब विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण भेटावे यासाठी तयार केला आहे परंतु महाविद्यालय कॉलेज फी वाढवून विद्यार्थ्यांनाच लूटण्याचं काम करत आहे असा आरोप अभाविप ने केला आहे.

महाविद्यालय प्रशासनाने BVoc साठी UGC च्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्या, प्रत्येक सेमिस्टर ला विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट न्ह्यायला हवी, विद्यार्थ्यांना योग्य ते सहकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी करावे व अश्या अनेक विद्यार्थी हिताच्या मागण्या अभाविपच्या वतीने करण्यात आल्या आहेत. सदर मागण्या ह्या रास्त असून निकाल उद्या लावण्यात येईल व बाकीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय करू असे तोंडी आश्वासन महाविद्यालयाच्या उप प्राचार्यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर आंदोलनाचे नेतृत्व अनिल ठोंबरे, योगेश्वर राजपुरोहित, सिद्धांत पाठक, तुषार काहूर, कुणाल कड्डे व इतर अभाविप कार्यकर्त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)