अंध विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन विद्यापीठात आंदोलन !

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अंध विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
लेखनिक म्हणून जाणाऱ्या विद्यार्थास न मिळणारे हक्काचे मानधन त्यांना देण्यात यावे. अंध मुलांना देण्यात येणारे प्रकल्प, असाइनमेंट्स रद्द करण्यात येऊन त्या जागी त्यांचा “ब्रेल” स्वरूपात पेपर अथवा “तोंडी” परीक्षा घेण्यात याव्या. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये “ऑडिओ नोटीस बोर्ड” लावण्यात यावे. महाविद्यालयांवर “गेट इंडिकेटर्स” बसवण्यात यावे. या विद्यार्थीहितार्थ मागण्यांकरिता अभाविपने आज विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर अंध विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी कुलगुरूंनी आंदोलनाची दखल घेऊन येत्या १५ दिवसाच्या आत सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात महानगर मंत्री अनिल ठोंबरे, महानगर सहमंत्री योगेश्वर राजपुरोहित, अभाविप आय-राईट (ABVP I-Write) प्रमुख सिद्धार्थ गिरमे, सा.  फु. पुणे विद्यापीठ अध्यक्ष अजय चौधरी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)