सातारा – राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे काम करणाऱ्या 15 हजार प्राध्यापकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या 18 वर्षांपासून पगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून (ता. 14) मुंबईतील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
कुटुंबाला द्या 50 लाखांचं संरक्षण कवच 13 प्रतिदिन
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील या 15 हजार प्राध्यापकांना 100 टक्के अनुदान देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सहविचार सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये मंगळवारी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचा निर्धार उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांनी केला आहे. कृती समितीने यापूर्वी राजाध्यक्ष तानाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 214 आंदोलन केली आहेत. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे आता अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा