शबरीमला बाहेर महिलांना रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन 

शबरीमला, (केरळ) – शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सुमारे 200 भाविकांनी आज जोरदार आंदोलन केले. या उग्र आंदोलकांनी मल्याळम वृत्तवाहिनीच्या एका कॅमेरामनवरही हल्ला केला. मासिक पाळीचे वय उलटून न गेलेल्या स्त्रिया मंदिरामध्ये प्रवेश करत असल्याच्या संशयावरून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून भाविक आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आज शबरीमाला मंदिराच्या आवारातील सन्निधानम येथे मोठ्या संख्येने जमा झाले होते.

जमाव प्रक्षुब्ध होण्याची चिन्हे दिसायला लागल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकारी वाल्सान थिलानकेरी यांनी लाऊडस्पीकरवरून शांतता राखण्याचे आवाहन केले. विशेष पूजेच्या निमित्ताने शबरीमला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी सोमवारी दोन दिवसांसाठी उघडले गेले. तेंव्हापासून या परिसरात भाविकांची गर्दी जमा होऊ लागली आहे. वार्षिकोत्सव असलेल्या “चितारा अट्टा थिरुनाल’ साठी यावेळी अभूतपूर्व गर्दी लोटली आहे. या गर्दीतील काही महिलांना भाविकांनी मंदिर प्रवेशास अटकाव केला. या महिलेने आपल्या वयाचा दाखला देण्यासाठी आधार कार्डही दाखवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्तात या महिलेला मंदिरात नेण्यात आले. या आंदोलनामुळे आंध्रप्रदेशातून आलेल्या महिलांच्या गटाने शबरीमला मंदिरात न जाताच पायथ्यापासून परत जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान काही दर्शनासाठी आलेल्या काही पत्रकारांनाही भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एका कॅमेरामनला नारळ फेकून मारण्यात आल्याचा आरोप काही पत्रकारांनी केला आहे. आंदोलनकर्त्या सुमारे 20 भाविकांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण दाखल करून घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)