“दबंग 3’मध्ये मौनी रॉयची एन्ट्री

बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा “भारत’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपल्या आगामी “दबंग 3’च्या तयारीला लागणार आहे. त्यातच “दबंग 3’मधील एक गाणे रिकॉर्ड करण्यात आले असून “मुन्ना बदनाम हुआ…’ असे त्याचे बोल आहेत. आता या चित्रपटात छोटया पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयची एन्ट्री झाली आहे.

“दबंग 3’चे शूटिंग मुंबईतील स्टूडिओमध्ये करण्यात येत आहे. यावेळी सलमन खानसोबत अभिनेत्री मौनी रॉयही शूटिंग करणार आहे. यात मौनी आपल्या अदाकारीसोबत डान्सचा जलवा दाखविणार आहे. मौनीवर साकारण्यात येत असलेल्या गाण्याचे शूटिंग वसईस्थित स्टूडिओमध्ये होणार आहे. हे शुटिंग पुढील आठवड्यापासून करण्यात येणार आहे.

बॉलीवूडमधील दबंग सलमान खानसोबत मौनी रॉय आपल्या सेक्‍सी मुव्य परफॉर्म करणार आहे. यापूर्वी सलमान आणि मौनी या जोडीने बिग बॉसच्या सेटवर परफॉर्म केलेले आहे. बिग बॉसच्या सेटवरच दोघांची ओळख झाली होती.
दरम्यान, सोनाक्षीने आपले शूटिंग सुरू केले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते. “दबंग’ सीरीजमधील हा तिसरा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)