केवळ ‘या’ बैठकीपर्यंतच मोतीलाल व्होरा काँग्रेस अध्यक्षपदी

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. निवडणुकीतील प्रभावाची जबादारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर अनेकांनी राहुल गांधींची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, तरी सुद्धा राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर आपल्या राजीनाम्याचे पत्र शेअर केले आहे. आपल्या ट्विटर खात्यावरील माहिती देखील अद्यावत करत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष अशी आधी भरलेली माहिती बदलून त्या जागी काँग्रेस सदस्य अशी माहिती भरली आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर आता काँग्रेसच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची नियुक्ती झाली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये आपण नव्या काँग्रेस अध्यक्षाचा शोध घेण्याची जबाबदारी काही लोकांकडे सोपवली असल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे अथवा मालिकार्जून खरगे यांचे नाव घोषित केले जाऊ शकते.

https://twitter.com/ANI/status/1146402384840724480

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)