2018 मध्ये गुललवर सर्वाधिक सर्च रजनीकांतच्या 2.0 चा

2018 मध्ये अनेक चांगले सिनेमे रिलीज झाले. कमी बजेटमध्ये तयार झालेले सिनेमे हिट झाले. पण मोठ्या बजेटच्या सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर दणका बसला. “2.0′ आणि “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ ही त्याची उदाहरणे. मात्र इंटरनेटवर या सिनेमांबाबत सर्च होण्यात सर्वात अग्रेसर राहिला रजनीकांतचा “2.0′ वेगवेगळ्या कारणांनी या सिनेमाच्या रिलीजला उशीर झाला. वर्षाच्या सुरुवातीला रिलीज व्हायच्या ऐवजी वर्षाच्या शेवटी तो रिलीज झाला. पण त्याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक होती. म्हणूनच गुगलवर त्याचा सर्वाधिक सर्च झाला.

त्यानंतर टायगर श्रॉफचा “बागी 2′, सलमान खानचा “रेस 3′, “एव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’, “टागर जिंदा है’ आणि “संजू’ या सिनेमांचा लुक, कलाकार, ट्रेल्सर, टीझर, गॉसिप आणि प्रमोशनल न्यूजबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च झाले. त्याशिवाय “पदमावत’बाबतच्या वादविवादांमुळे तो सिनेमाही सर्वात चर्चेत राहिला. त्यातील वादांच्या अपडेटच्या बातम्या वाचण्यासाठी प्रेक्षकांनी गुगलवर त्याला सतत “सर्च’ केले. गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या पहिल्या 10 क्रमांकांच्या अन्य सिनेमांमध्ये “धडक’ आणि “ब्लॅक पॅंथर’ही आहे. मात्र त्यात “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चा क्रमांक लागू शकलेला नाही.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)