पाच राज्यात प्रादेशिक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते

नवी दिल्ली: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाचही राज्यांत मतदारांनी नोटा (नन ऑफ द अबॉव्ह-वरीलपैकी कोणीही नाही.) चा वापर सढ़ळ हाताने केलेला आहे. प्रादेशिक पक्षांना पाचही राज्यांमध्ये नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून आले आहे.

छत्तीसगड मध्ये नोटाचा वापर सर्वात जास्त (2.1 टक्के), तर मिझोराममध्ये सर्वात कमी (0.5टक्के) झालेला आहे. नोटा चा वापर मध्य प्रदेशात

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1.4 टक्के, राजस्थानमध्ये 1.3 टक्के, छत्तीसगडमध्ये 0.5 टक्के आणि तेलंगणामध्ये 1.1 टक्के करण्यात आलेला आहे. मतांची संख्या पाहिली तर मध्य प्रदेशात 5,42,295 मते नोटाला मिळाली, राजस्थानमध्ये 4,67,781 मते, तेलंगणामध्ये 4,67,781मते, मिझोराममध्ये 2,917 मते, आणि छत्तीसगडमध्ये 2,82, 744 मते नोटाला मिळालेली आहेत.

राजकीय पक्षांचा विचार केला, तर आप आणि सपासह प्रादेशिक पक्षांचे मतदारांनी पानिपत केले आहे. या पक्षांना पाचही राज्यांमध्ये नोटापेक्षाही कमी मते मिळालेली आहेत. छत्तीसगडमध्ये नोटा 2.1 टक्के, तर 90 पैकी 85 जागा लढवणाऱ्या आप ल 0.9 टक्के, सपा 0.2 टक्के मते मिळाली आहेत. मिझोराममध्ये नोटा 0.5 टक्के, तर प्रिझम ला 0.2 टक्के मते मिळाली आहेत, मध्य प्रदेशात नोटा 1,4 टक्के, तर सपा 1टक्के व आप ला 0.7 टक्के, राजस्थानमध्ये नोटा 1.3 टक्के, तर सपा ला 0.2 टक्के, आणि तेलंगणात नोटा 1.1 टक्के, तर एनसीपी 0.2 टक्के मते मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)