नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने अखेरचे तीन सामने जिंकत मालिका 3-2 अशा फरकाने जिंकताना विश्वचषकाच्या दृष्टीने आपला ऑस्ट्रेलियन संघाने आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला असून या मालिकेत समाधानकारक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकून देणाऱ्या उस्मान ख्वाजाने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, विश्वचषकाला आणखीन भरपुर वेळ असून सध्या आम्ही भारता विरुद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा आनंद लुटत आहोत.
यावेळी उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या मालिकेत पाचही सामन्यात उत्कृष्ठ कामगिरी नोंदवली असून त्याने यामालिकेतील पाच सामन्यांमधे 76.60च्या सरासरीने तब्बल 383 धावा केल्या असून कोणत्याही फलंदाजाने भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत केलेल्या सर्वाधिक धावा केल्या असून हा एक विक्रम देखील त्याने आपल्या नावावर केला आहे.
यावेळी बोलताना ख्वाजाने सांगितले की, भारतीय संघ सध्याच्या घडीला जगातील सर्वात बलाढ्य संघ समजला जातो. त्यांच्याकडे चांगल्या फलंदाजांबरोबरच चांगले गोलंदाज देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लागोपाठ तीन सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकणे हे कोणत्याही संघासाठी आत्मविश्वास वाढवणारे आहे. त्यात मागिल महिण्यातच त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे येत आमच्या विरोधातील मालिका जिंकली होती. त्यामुळे हा विजय आमच्यासाठी खुप महत्वाचा आहे.
सध्या आम्ही कोणताही दबाव न घेता केवळ चांगली कामगिरी करण्यावर भर देतो आहोत.
विश्वचषक स्पर्धेपुर्वी आम्हाला अजुन पाक्ष्च एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्यात आम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहोत. त्यामुळे आम्हाला सरावाची भरपुर संधी उपलब्ध आहे. त्यातच आमचा संघ पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सकारात्मक वातावरणात आलो आहोत आणि त्याचा फायदा आम्हाला नक्कीच आगामी मालिकेत आण्इ विश्वचषकात होइल असेही त्याने यावेळी सांगितले.
तसेच त्याच्या कामगिरीच्या बळावर त्याला विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळेल का असे विचारले असता त्याने सांगितले की, आम्ही सध्या आगामी पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठीच्या तयारीला लागलो असून आम्हीविश्वचषकाच्या दृष्टीने विचार करत नाहीत. कारण त्याला बराच अवधी आहे. त्यातच आम्हाला विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. आम्ही त्या साठी तयारी देखील सुरू केली असून आम्ही जास्तित जास्त चांगली कामगिरी करण्यावर भर देतो आहोत.