महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी एक लाखाहून अधिक घरे मंजूर

आजपर्यंत 7 लाख 30 हजार 220 घरे मंजूर  

नवी दिल्ली: केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत  आज महाराष्ट्रातील शहरी गरीबांसाठी 1 लाख 1 हजार 220 घरे मंजूर केली  आहेत. आतापर्यंत  महाराष्ट्राला  7 लाख 30 हजार 220 घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज झालेल्या 43 व्या बैठकीत  देशात एकूण 5 लाख 60 हजार 695 घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत  केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 43 व्या बैठकीत महाराष्ट्रासह  (1,01,220), उत्तरप्रदेश (1,79,215),  आंध्र प्रदेश (1,10,618), कर्नाटक (48,729), मध्य प्रदेश (26,587),  गुजरात (25,861), मणिपूर (13,715),  तामिळनाडू (12,174), बिहार (10,084),  ओडिशा (7,472), छत्तीसगड (7,067), केरळ(4,194) हरियाणा (4,019 ), राजस्थान (3,601), झारखंड (2,165) , आसाम (1,419), मेघालय (1,397) आणि पाँडेचेरी (1,158)  अशी एकूण 5  लाख 60 हजार 695 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

या बैठकीत एकूण 33 हजार 873 कोटी खर्चाच्या 1 हजार 243 प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 8,404 कोटींचा सहायता निधी मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता  79 लाख 4 हजार 674 घरांना मंजुरी  दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)