ईव्हीएम मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे करणार ! -इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशिन आंदोलनाचा पवित्रा

नगर: लोकसभा निवडणुक ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी निवडणुक आयोगाने धुडकाऊन लावल्याने विद्रोही विचारमंच व इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन आंदोलनाच्या वतीने नगर दक्षिण मतदार संघातून ईव्हीएम मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जालिंदर चोभे पाटील यांनी दिली. निवडणकीत शंभर उमेदवारांना अर्ज भरण्यास तयार करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

चोभे यांनी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्यासाठी अनेक आंदोलने व उपोषण केली. ईव्हीएम मशीनच्या विरोधात त्यांनी पुस्तिका व माहितीपत्रके वाटून मतदान बॅलेटपेपरवर होण्यासाठी जागृती केली. मात्र निवडणुक आयोगाने या संदर्भात लक्ष दिले नसल्याने त्यांनी आगळा-वेगळा फंडा अवलंबला आहे. ईव्हीएम मशीनसाठी 64 उमेदवारांची क्षमता आहे.

यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात एकाचवेळी उतरल्यास जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यास बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची वेळ येणार आहे. यासाठी सुमारे 100 उमेदवार लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघात उतरविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. व्हीव्ही पॅट मशीनमुळे पुन्हा मतपडताळणीचा अधिकार संपुष्टात आला असून, तो अधिकार फक्त प्रतिस्पर्धी उमेदवारास देण्यात आला आहे. त्यामुळे इतर उमेदवारांच्या मतांची हेराफेरी होणार असल्याची भिती त्यांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)