नैतिक बुद्धिमत्ता सर्वांत मोलाची

ऍड. सीमंतिनी नूलकर

माणसाचं विश्‍वातलं सजीवसृष्टीतलं स्थान, आयुष्याची क्षणभंगुरता याची जर प्रत्येक क्षणी जाणीव राहिली, तर खूप काही सोपं होऊन जातं. अहंकार, स्पर्धा, सूड, द्वेष, हिंसा या किती निरर्थक गोष्टी आहेत आणि त्यासाठी आपण काय काय पणाला लावतो, त्याचा शेवटी उपयोग काय हे समजून चुकतं. याअर्थाने एुळीींशपींळरश्र बुद्धिमत्ता प्रगल्भ असणं आवश्‍यक ठरतं. या प्रकारची बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी सजगता असणं, तसा प्रयत्न होणं महत्त्वाचं ठरतं.

नैतिक बुद्धिमत्ता
Moral Intelligence

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांचे प्रकार पाहिले. डॉ. गार्डनरनी स्वतः आधी ज्या बुद्धिमत्ता मांडल्या. त्यात त्यांनी स्वतःही नंतर भर घातली. इतरांनीही जीवन संकल्पना मांडल्या. या संकल्पनोंवर खूप अभ्यास, संशोधन झालंय, होतंय. त्यात अजून भरही पडतेय. अशाच एका बुद्धिमत्तेच्या प्रकाराची आपण आज माहिती करून घेऊ. ही अगदी अलीकडची संकल्पना आहे. नैतिक Moral Intelligence किंवा M.Int. बुद्धिमत्तेला Central intelligence किंवा मध्यवर्ती बुद्धिमत्ता असंही म्हणतात.

या बुद्धिमत्तेचा प्राथमिक आविष्कार म्हणजे नैतिक, अनैतिक, योग्य अयोग्य, चूक आणि बरोबर यातलं अंतर जाणून, योग्यप्रकारे वागणे, नैतिक बुद्धिमत्ता हा इतर बहुविध बुद्धिमत्तांची स्थायी प्रेरणा असते. नैतिक प्रेरणाही जन्मजात असते. नैसर्गिक असते. नैतिकतेवर आधारलेले निर्णय मनाच्या सुप्त पातळीवर आपोप होत असतात किंवा घेतले जातात. नैतिक बुद्धिमत्ता विकसित असेल तर अशा व्यक्‍ती जबाबदारी स्वीकारणाऱ्या असतात. त्या खुलेपणानं चुका, अपयश मान्य करतात.

त्यांच्यात क्षमाशीलता असते. इतरांच्या चुका उगाळत बसत नाहीत. त्या सोडून देण्याची वृत्ती असते. त्या काळजी करणाऱ्या व्यक्ती असतात आणि वागण्यात सचोटी असते. निष्पक्षता असते. इतर लोकांच्या मतांना, विचारांना मूल्यांना त्या तेवढेच महत्त्व देतात, आदर राखतात. दुसऱ्यांचे मोठेपण मान्य करण्यात कमीपणा मानत नाहीत. प्रत्येक व्यक्ती तिचे म्हणून हक्क आहेत, तिची म्हणून काही श्रद्धास्थानं आहेत, विश्‍वास आहेत हे त्यांना मान्य असतं.
त्यांचा स्वतःच्या वागणुकीवर ताबा असतो. स्वतःचे विचार, कृतीचे नियमन यशस्वीरित्या करण्याची क्षमता त्यांच्यात असते आणि नैतिक, योग्य त्या मूल्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहतात.

अशा व्यक्ती वैयक्‍तिक आयुष्यात प्रभाव टाकताततच पण professional म्हणूनही विश्‍वासार्ह असतात नैतिकता जर दुर्लक्षली तर त्याचे परिणाम कधीच चांगले नसतात. समाज की बुद्धिमत्ताच समाजाचेही काही ऋण असतात. ते फेडायचे असतात. ही नैतिक बुद्धिमत्ताच असते. अलीकडे जेव्हा अल्पवयीन मुलांच्या हातून भयानक गुन्हे घडल्याचे प्रमाण वाढलेले दिसते. तेव्हा उपजत नैतिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची गरज वाटते की नाही?

अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता

Existential Intelligence

Existential Intelligence ही संकल्पना डॉ. गार्डनर यांनीच मांडली आहे. बुद्धिमत्तेचा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. अशी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींना “hife smart” म्हणतात. आपण पाहतो की काही लोकांना प्रश्‍न पडतात की माणूस जन्माला का आला? मरण म्हणजे का? मरणानंतर काय होतं? त्यांचा हा विचार, शोध स्वतःशी सतत चालू असतो. काही लोकांना ा विचार नसतो किंवा अशा प्रश्‍नात ते गुंतून पडत नाहीत. म्हणजेच या प्रकारची बुद्धिमत्ता कमी, जास्त असण्याचाच हा प्रकार. या प्रकारची बुद्धिमत्ता ज्या व्यक्तीमध्ये विकसीत झालेली असते, प्रगल्भ असते, त्या व्यक्ती म्हणजे, तत्त्ववेत्ते, योगी, धर्मगुरू वगैरे. अशा व्यक्तींकडे “स्व’चे सखोल मूल्यमापन करण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती त्रिमितीय विचार करू शकतात. मनुष्याचे संपूर्ण विश्‍व पसाऱ्याच्या दृष्टीने अस्तित्व, किती नगण्य आहे याचे आकलन, जाणीव त्यांना पुरेपूर असते.

“स्व’ला किती महत्त्व द्यायचं याच्या मर्यादा अशा व्यक्‍ती जाणून असतात. स्वतःची किंवा माणूस म्हणून असणारी दुर्बलता, किंवा सामर्थ्यस्थानं यांची पूरेपूर जाणीव असते. या व्यक्तींचा आत्मपरीक्षण करण्याचा स्वभाव असतो. व्यक्ती म्हणूनही आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि ते का वेगळे आहोत, हेही त्यांना माहीत असतं. अशा व्यक्‍ती self-motivated किंवा स्वयंप्रेरित असतात.

वैयक्‍तिक आयुष्य म्हणूनही आणि माणूस म्हणून जन्माला आलो, म्हणूनही, आयुष्य समृद्ध होण्यासाठी सर्वात आवश्‍यक गोष्ट कोणती? तर आत्मपरीक्षण आत्मशोध आणि आत्मसंवाद. म्हणजे पुन्हा intrapersonal हा विषय आलाच. म्हणजेच intrapevsonl intelligence, Existential intelligence या संलग्न, साधर्म्य असलेल्या बुद्धिमत्ता म्हटल्या पाहिजेत.

(क्रमशः)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)