पुणे – मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या व जोरदार पावसाने हजेरी लावली. आज कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर शुक्रवारपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा मध्ये महाराष्ट्रातील पावसाने ओढ दिलेल्या भागात मेघगर्जना विजांसह पावसाने आज हजेरी लावली.
कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, असले तरी पाणीटंचाई कमी होण्यास मराठवाडा अणि विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.