पैसा, दहशत हा आमचा पिंड नाही- डॉ. विखे

कोणावर किती गुन्हे हे उमेदवारी अर्ज भरताना कळेल
पारनेर –
धनशक्‍ती विरुद्ध जनशक्‍ती अशी लढाई होणार असल्याची टिका केली जाते. परंतु इंपोर्टेड गाड्या कुणाकडे आहेत. हे पाहा, पैसे, दहशत हा आमचा पिंड नाही. कोणावर किती गुन्हे आहे हे उमेदवारी अर्ज भरल्यावर कळणार आहे. पन्नास वर्षे विखे कुटुंब राजकारणात अनेक पदे मिळवून एकही गुन्हा दाखल नाही. राजकारणात पैशाचा वापर हा गोरगरीब व सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचा आहे, समोरच्या उमेदवाराची गॅरंटी माझ्यासारखी जिल्हातील नेते घेतील का असा सवाल भाजपचे उमेदवार

डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला पारनेर बाजारतळावर प्रचारार्थ सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, उपसभापती ना. विजय औटी, काशीनाथ दाते, राहुल झावरे, विश्‍वनाथ कोरडे, बंडू रोहकले, अनिकेत औटी आदी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, पारनेर तालुक्‍याने आयात केलेला व बाहेरचा उमेदवार म्हणू नका. पद्‌मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून माझी नाळ या तालुक्‍याशी जोडली आहे. आठ वर्षांपासून विधान परिदषदेचे प्रतिनिधी म्हणून काम करता परंतु पारनेर तालुक्‍यातील विकास कामांसाठी किती निधी दिला. हे सांगता येणार नाही.

ना. शिंदे म्हणाले, मोठी वाताहात विरोधी पक्षाची चालू झाली असून राज्यात व देशात पावसा ओरडत आहे. त्यामुळे उमेदवारी बदलण्याची वेळ विरोधकांवर येत आहे. जलसंधारण व इतर पाणी आडवा पाणी जिरवा इतर कामे राज्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने सर्व सामान्य हिताचे निर्णय घेतल्याने फार मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. विखेंवर मतांचा पाऊस पडणार आहे असे ते म्हणाले. यावेळी ना. औटी यांचे भाषण झाले.

भोसले, शेळकेंची दांडी

या सभेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके यांनी दांडी मारली. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुजय विखे यांनी भोसले यांच्याविरोधात निघोज गटामध्ये प्रचार केला होता तर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये गणेश शेळके यांच्या विरोधात राहुल झावरे यांनी राजकीय खेळी केली होती. त्यामुळे झावरे व विखे यांच्यावर हे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे ते गैहजर राहिले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)