आण्विक आस्थापना, कैद्यांच्या याद्यांची भारत-पाकिस्तानमध्ये देवघेव

नवी दिल्ली:-भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी आण्विक आस्थापना आणि कैद्यांच्या याद्यांची देवघेव केली. द्विपक्षीय करारांतर्गत दोन्ही देशांनी सलग 28 व्या वर्षी एकमेकांना आण्विक आस्थापनांशी संबंधित याद्या दिल्या. त्या करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांच्या आण्विक आस्थापनांवर हल्ला करण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक आस्थापनांची माहिती अनिवार्य करणारा करार 31 डिसेंबर 1988 मध्ये झाला. तो 27 जानेवारी 1991 पासून लागू झाला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 1 जानेवारी 1992 ला सर्वप्रथम आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवघेव झाली. दरम्यान, भारतातील तुरूंगांमध्ये पाकिस्तानचे 249 नागरिक आणि 98 मच्छिमार आहेत. त्यांच्याशी संबंधित यादी पाकिस्तानला सादर करण्यात आली.

पाकिस्तानने दिलेल्या यादीनुसार त्या देशातील तुरूंगांमध्ये भारताचे 54 नागरिक आणि 483 मच्छिमार आहेत. दोन्ही देश प्रत्येक वर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला कैद्यांच्या याद्यांची देवघेव करतात. त्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये 2008 ला करार झाला. दोन्ही देशांनी बऱ्याचदा संबंध ताणले जाऊनही आण्विक आस्थापना आणि कैद्यांच्या याद्यांची देवघेव करण्याची प्रक्रिया खंडित केलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)