श्री क्षेत्र मोहटा देवस्थानात घटस्थापना

मोहटे (ता. पाथर्डी) ः येथील श्री क्षेत्र मोहटा मंदिरात देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे सपत्नीक यांचेहस्ते घटस्थापना करण्यात आली.

न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांचे हस्ते धार्मिक विधी

पाथर्डी – श्री क्षेत्र मोहटा देवस्थानात पारंपारिक पद्धतीने देवीच्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांचे हस्ते मुख्य धार्मिक विधी झाला. मोहटे गावात विश्वस्तांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर सुवर्ण अलंकाराने सजवलेल्या देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, टिपऱ्या पथक सहभागी झाले होते.

देवीच्या साडेतीन शक्ती पिठांपैकी श्री क्षेत्र माहुरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे. चौंसष्टयोगिनी, अष्टभैरव, व दश महाविद्यांच्या मूर्ती श्री यंत्राकार दर्शन रांगेत स्थापित असून असे स्थान राज्यात एकमेव आहे. सातव्या माळेपर्यंत पायी चालत येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते. वेदशास्त्रसंपन्न बबन कुलकर्णी, राजू मुळे व भूषण साकरे यांनी पौरोहित्य केले.

घटस्थापनेसाठी देवस्थान समितीचे विश्वस्त ऍड. प्रसन्न दराडे, भास्कर सांगळे, गोरक्षनाथ ओव्हळ, शिवाजी पालवे, डॉ. हर्षवर्धन पालवे, राजेंद्र भंडारी, रामदास पालवे, सुनीता राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते. चालू वर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने देवस्थान समिती ने मोहटे गावातील पाऊतका येथे एक लाख लिटर पाण्याचे शेततळे करून त्यामध्ये टॅंकरद्वारे पाणी सोडून गडावर पाणी पोहचविले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)