निकालाआधी मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट ?

नवी दिल्ली – 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलने मतांची टक्केवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 23 मे ला जाहीर होणाऱ्या या निकालाबाबत सध्या अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. या भेटी अंतर्गत मोदी आणि मोहन भागवत यांच्यात अनके महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे देखील सांगण्यात येते आहे.

गेल्या चार वर्षात पंतप्रधान मोदींचा हा पहिला संघ मुख्यालयाचा दौरा असणार आहे. एनडीएची पूर्ण बहुमत मिळत नसल्यास संघ पंतप्रधान पदासाठी मोदींऐवजी इतर नेत्याचे नाव मांडण्याची शक्यता आहे. याच मुद्यांवरून नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. गेले अनेक दिवसांपासून मोदींनी संघातून काढता पाय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)