मोहम्मद शमी रणजी क्रिकेट मध्ये खेळणार

नवी दिल्ली: भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी रणजी करंडकात बंगालच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. शमीला बीसीसीआयने रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. आगामी केरळविरुद्ध सामन्यात बंगालकडून खेळण्यासाठी शमीने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. बीसीसीआयनेही शमीची विनंती मान्य केली असून, त्याला एका डावात फक्त 15 ते 17 षटकंच टाकण्याची अट घातली आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.

यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी हा भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर 33 बळी जमा झाले आहेत. बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने बीसीसीआयने घातलेल्या अटीचं समर्थन केलं आहे. मोहम्मद शमी आमचा महत्वाचा गोलंदाज आहे, त्यामुळे सामन्यात त्याने टाकलेली 15 षटके आमच्यासाठी पुरेशी असल्याचेही मनोज तिवारीने स्पष्ट केले आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत बंगालचा समावेश ब गटात करण्यात आला असून अद्याप एकही सामना जिंकता आला नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)