#वाचा मोहम्मद कैफच्या निवृत्तीबाबत काय म्हणतोय सचिन

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने 13 जुलै 2002 मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक नॅटवेस्ट वन डे मालिका जिंकली होती. त्या सामन्यात युवराज सिंगसह अविस्मरणीय खेळी साकारणाऱ्या मोहम्मद कैफने 16 वर्षांनंतर बरोबर त्याच दिवशी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. नोव्हेंबर 2006 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

मोहम्मद कैफने भारताकडून 13 कसोटी व 125 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2002 साली झालेल्या नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने लॉर्डसच्या मैदानावर 87 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. हा सामना 13 जुलै रोजी खेळला गेला होता तर आज 13 जुलै रोजीच मोहम्मद कैफने निवृत्तीची घोषणा केली हे विशेष

मोहम्मद कैफच्या निवृत्तीबाबत सचिनने ट्विट केले आहे 

सचिनने मोहम्मद कैफच्या निवृत्तीसाठी ‘आजचा’ दिवस निवडण्याच्या निर्णयाची प्रशंसा करताना हा दिवस आपल्या सर्वांसाठीच अविस्मरणीय असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)