मोहम्मद अझरूद्दीन हैदराबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

हैदराबाद: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याला कॉंग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादमधून रिंगणात उतरवले जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास अझरूद्दीन विरूद्ध एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी अशी लढत पाहावयास मिळेल. तेलंगण राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत. त्या सर्व जागांवरील संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी कॉंग्रेसकडून केली जात आहे.

हैदराबाद जागेसाठी अझरूद्दीनच्या नावाला पसंती देण्यात आल्याचे समजते. अझरूद्दीन सध्या तेलंगण कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अझरूद्दीन 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत राजस्थानच्या टोंक-माधोपूर मतदारसंघात त्याला पराभव पत्करावा लागला. आता मूळचा हैदराबादचा असणाऱ्या अझरूद्दीनला तिथूनच रिंगणात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)