मोदींच्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदी कायम- शरद पवार

किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण

बारामती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल. अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्‍चर्य वाटायला नको, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्थकारणाशी संबंधित अनेक निर्णय चुकल्याने सध्या देशभरात मंदीचे चित्र आहे. एकीकडे बहुमतातील सरकार असताना अर्थव्यवस्था व प्रशासन व्यवस्था रुळावर नाही. देशातील क्रयशक्ती असलेल्या घटकांचा खरेदीचा तर दुसरीकडे गुंतवणुकीची क्षमता असलेल्यांचा गुंतवणुकीचा मूडच नसल्याने त्याचा परिणाम बाजारातील छोट्या व्यापाऱ्यांवर होताना दिसत आहे.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटबंदी ही तर पार फसली, नोटबंदीमुळे ना काळा पैसा बाहेर आला, ना दहशतवादी कारवाया थांबल्या. लोकांनाच प्रचंड मनस्ताप झाला. नवीन नोटा छपाईसाठी अवाढव्य खर्च झाला. चलनटंचाईच्या तुटवड्‌याने बाजारात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकटच झाली, अशी टीकाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)