मोदींच्या विजयानंतर ‘टाइम’ची पलटी; दुफळी निर्माण करण्याऐवजी देशाला जोडणारा नेता 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिले होते. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’ असा करण्यात आला होता. जगभरात या लेखाची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, निवडणूक निकालाच्या सहा दिवसांत टाइम मासिकाचे सूर बदलले आहेत. मंगळवारच्या एका लेखात टाइमने नरेंद्र मोदींना देश जोडणारा नेता म्हणून संबोधले आहे.

टाइम मासिकाने एक लेख छापला आहे. या लेखाचे शीर्षक ‘Modi has united India like no Prime Minister in decades’ म्हणजेच दशकांपासून कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाही असे मोदींनी भारताला जोडले आहे. हा लेख  मासिकात मनोज लाडवा यांनी लिहला आहे. मनोज लाडवा यांनी २०१४ साली नरेंद्र मोदी फॉर पीएम कॅम्पेन चालविले होते.

लेखात मनोज लाडवा यांनी म्हंटले कि, देशात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या जातीयवादाला नरेंद्र मोदींनी संपुष्टात आणले. आणि लोकांना एकत्रित करत मते प्राप्त केली. नरेंद्र मोदींना मागासवर्गीय जातींतील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश आले आहे. परंतु, पाश्चिमात्य माध्यमे अद्यापही नरेंद्र मोदींना उच्चवर्गीय जातींचा नेता म्हणूनच दाखवितात.

नरेंद्र मोदींचे कौतूक करताना लाडवा लिहले कि, एका गरीब कुटूंबातून असतानाही त्यांनी देशातील सर्वात मोठ्या पदावर जागा बनवली. आणि गांधी कुटुंबियांशी राजकीय युद्ध केले. ते पुढे म्हणाले कि, पाच वर्षां अनेक वेळा टीका होऊनही जय पदतीने नरेंद्र मोदींनी देशाला सूत्रबद्ध केले आहे. त्या पद्धतीने मागील पाच दशकातील कोणत्याही पंतप्रधानांना करता आलेले नाही, असे त्यांनी लिहले आहे.

https://twitter.com/TIME/status/1126607829429837825

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)