मोदींचे समर्थक मेघनाद देसाई म्हणतात मोदी टीम लिडर नाहीत

मुंबई: आजपर्यंत नरेंद्र मोदी यांचे समर्थक असणारे ब्रिटीश राजकारणी व आर्थिक विषयाचे विश्‍लेषक मेघनाद देसाई यांनी मोदींना आता निवडणूक जिंकणे अशक्‍य असल्याचे भाकित केले आहे. मोदी हे टीम लिडर नाहीत, लोक त्यांना पुन्हा बहुमत देणार नाहीत असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले आहे.

मोदींच्या निवडणूक भवितव्याविषयी आपले विश्‍लेषण करताना त्यांनी म्हटले आहे की आपण नोकरशहांच्या मदतीने एकट्यानेच देश चालवू अशा आत्मप्रौढीमुळे मोदींचे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये त्यांना असे करणे शक्‍य झाले पण देशाच्या पातळीवर त्यांचे हे गणित चुकले. त्यातच त्यांनी लोकांना भरमसाठ आश्‍वासने दिली. त्यामुळे अर्थातच लोक नाराज झाले. अच्छे दिन अजून का आले नाहींत हा प्रश्‍न लोकांना पडला असे त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेले मेघनाद हे तेथील लेबर पार्टीचे नेते राहिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की मोदींना खूप काही चांगले करून दाखवण्याची संधी होती पण त्यांनी आपली टीम त्यासाठी बरोबर घेतली नाही त्यामुळे त्यांना सत्ता असूनही फारसे काहीही साधता आले नाहीं. मोदी हे एक चांगले राजकारणी आहेत पण त्यांना आपली टीम बरोबर न घेता आल्याने ते चांगले टीम प्लेअर ठरू शकले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

अर्थात मोदींच्या मंत्रिमंडळात जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या खेरीज अन्य कोणीही फारसा अनुभवी नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. त्या उलट युपीएच्या काळात प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, अर्जून सिंह, शरद पवार यांच्या सारखे किमान सहा पंतप्रधानांच्या तोडीचे नेते त्यांच्या मंत्रिमंडळात होते. आपल्यासाठी परिस्थिती इतकी अवघड होऊन जाईल याची कल्पना मोदींनी कधीच केली नसावी. आता तर त्यांना आपल्याला आणखी एक संधी द्या अशी विनवणी लोकांना करावी लागण्यापर्यंतची वेळ आली आहे.

आगामी निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाहीं त्यामुळे एनडीए किंवा युपीए आघाडी सरकारसाठी भारताला तयार राहावे लागेल. एकपक्षीय राजवटची संधी पुन्हा हुकणार आहे असे भाकितही त्यांनी केले आहे. राजकारणी लोक आपले भले करू शकतील यावर लोकांनी विश्‍वास ठेवणेच सोडून दिले पाहिजे असे मतही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)