मोदींचा प्रवास ‘इरॉन नाऊ’ वेब सिरीजमधून उलगडणार

दहा भागांची सिरीज असून, फैझल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर हे तीन अभिनेते मोदींच्या भुमिकेत दिसणार  

पंतप्रधान मोदींच्या जीवनारवर चित्रपटाची घोषणा झाली असतानाच आता, चित्रपटानंतर वेब सिरीजही प्रदर्शनच्या वाटेवर आहे. ‘इरॉन नाऊ’ दहा भागांची सिरीज सुरु करणार असून, फैझल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर हे तीन अभिनेते यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

-Ads-

दहा भागातल्या वेब सिरीजमध्ये मोदींचे बालपण, त्यांचा राजकीय प्रवेश, मुखमंत्रीपदाची कारकीर्द आणि २०१४ मध्ये पंतप्रधानाची माळ गळ्यात पडेपर्यंतचा मोदींचा प्रवास या वेब सिरीजमधून उलगडणार आहे.

ही वेबसीरीज एप्रिलमध्ये निवडणूकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार असून, वेब सिरीज मध्ये मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता ‘महेश ठाकूर’ यांचा फस्ट लुक लॉन्च करण्यात आहे. अभिनेता महेश ठाकूर यापूर्वी शरारात, सासुराल गेंदा फुल, जय हो, आशिकी २ या सारख्या सिनेमात झळकला आहे.

या वेब सिरीज संपूर्ण शूटिंग गुजरात मध्ये पार पडलं असून, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सिनेमा आणि वेब सिरीज अशा दोन माध्यमांतून मोदींच व्यक्तीमत्व समोर येणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)