मोदींची संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांशी चर्चा 

वातावरण बदलाविषयी भारताने केलेल्या उपायांची दिली माहिती 

ब्युनॉस आयर्स: सध्या विदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे संयुक्तराष्ट्र संघाचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेरेस यांची गुरवारी येथे भेट घेऊन त्यांच्याशी जागतिक विषयांवर चर्चा केली. सध्या संयुक्तराष्ट्रांनी जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदलांविषयी गांभीर्याने उपाययोजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने भारताने केलेल्या उपाययोजनांची माहिती मोदींनी त्यांना दिली.

-Ads-

संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे असे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. वातावरणातील बदलांविषयी भारताने जे प्रयत्न सुरू केले आहेत त्याला जागतिक स्तरावरून वाखाणले जात असून संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनीही त्याची दखल घेतल्याचे या बैठकीतून अधोरेखीत झाले आहे असेही पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर मध्ये नमूद करण्यात आले आहे. जी 20 परिषदेत भाग घेण्यासाठी मोदी येथे आले आहेत त्या अनुषंगाने ही भेट आयोजित करण्यात आली होती. तत्पुर्वी मोदींनी सौदी अरेबियाचे राजे क्राऊन प्रिंस सलमान यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उर्जा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दल चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)