दुष्काळ मदतीच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला मोदींकडून बगल

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली. पंतप्रधान दुष्काळ आणि शेतकरी कर्जमाफीवर बोलतील अशी त्यांची आशा फोल ठरविली. भाजप सरकारने केलेल्या देशभरातील विकासकामांची भलीमोठी यादी वाचून दाखवत पंतप्रधान मोदी यांनी शेजाऱ्यांच्या प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही.

पंतप्रधान सोलापूरला येणार असल्याने सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या आशेने आलेले होते. व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहत महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आहे. सोलापूर जिल्हासुद्धा यामध्ये होरपळून जात आहे. सोलापूर जिल्ह्यात तर केवळ 38 टक्के पाऊस पडला असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. हा दुष्काळ पाहण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांचा दौरासुद्धा झाला आहे. केंद्राकडे तसा दुष्काळाचा अहवालही देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दुष्काळासाठी दिलेल्या प्रस्तावाबाबत विचार व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. दरम्यान त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. भाषण सुरु होऊन संपत आले तरीसुद्धा मोदी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दुष्काळाबद्‌दल कोणतीच वाच्यता केली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)