मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाची खिल्ली उडवली जात आहे- राज ठाकरे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर टीका केली.

हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तज्ज्ञ हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता, असे मोदी म्हणाले होते.

नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मोदींचे ते विधान गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनही ट्विट करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाल्यानंतर ते ट्विट डीलिट करण्यात आले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)