बिश्केक- किरगीझस्तानची राजधानी बिश्केक इथे सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर प्रहार केला आहे. एससीओ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही मिनिटांसाठी भाषण केले होते.
PM Modi in Bishkek: Literature & culture provide our societies a positive activity, stop the spread of radicalization among the youths. During my visit to Sri Lanka I visited the St. Anthony's shrine, where I witnessed the ugly face of terrorism that takes the lives of innocents. pic.twitter.com/JeSoVtb3Vg
— ANI (@ANI) June 14, 2019
यावेळी पंतप्रधान मोदींनी एससीओ सदस्यांसमोर म्हंटले कि, दहशतवाद कायमचा संपवला पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण देशांनी दहशतवादा विरोधात एकत्र आले पाहिजे. जेव्हा मोदींनी दहशतवादाचा मुद्दा आपल्या भाषणात उचलला तेव्हा पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान देखील तेथे उपस्थित होते. यावेळी मोदींनी दशतवादासहित इतर अनेक मुद्यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
Prime Minister Narendra Modi addressing the leaders of Shanghai Cooperation Organisation member states at the SCO summit in Bishkek, Kyrgyzstan. pic.twitter.com/hiJzyVLhj0
— ANI (@ANI) June 14, 2019