यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्माननाने होणार गौरव

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘झाएद पदका’ने सन्मान करण्यात येणार आहे. अबूधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल संयुक्त अरब अमिरातकडून घेण्यात आली आहे. मोदींना संयुक्त अरब अमिरातचा हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. याआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, शी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना ‘झाएद पदका’ने गौरवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संयुक्त अरब अमिरातकडून दिले जाणारे ‘झाएद पदक’ बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिले गेले आहे. पी-5 मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो. मात्र आता या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्यानं हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचं यूएईनं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी आणि सामरिक संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. विविध क्षेत्रांमधील सहकार्यदेखील वाढीस लागल्याचा उल्लेख यूएईनं केला आहे.

याबरोबर प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एक खास संदेश देखील लिहिला असून ते लिहितात, ‘भारत आणि युनायटेड अरब अमीरात यांच्या दरम्यान ऐतिहासिक संबंध असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी माझे मित्र व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची पोचपावती म्हणून आम्ही त्यांना या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)