मोदी लाट ओसरली? मोदींच्या पहिल्याच जाहीर सभेत मागील खुर्च्या रिकाम्या

प्रातिनिधिक छायाचित्र

देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवल्या असून विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून देखील आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान तथा भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची आज लोकसभा निवडणुकांपूर्वीची पहिलीवहिली जाहीर प्रचार सभा उत्तर प्रदेशातील मेरठ येथे आयोजित करण्यात आली होती मात्र मोदींच्या सभेला मागच्या रांगेतील खुर्च्या रिकाम्या राहिल्याने मोदींचा करिष्मा कमी झाला आहे की काय असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये आज दिवसभर चर्चिला जात होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोदींनी आज पहिली सभा मेरठ येथे घेतली. या सभेला मोदींसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर दिग्गज नेते देखील मंचावर उपस्थित होते. मोदींच्या या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी देखील केली होती मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगांमध्येच होती. तर मागच्या भागामध्ये आसन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या सभेसाठी उपस्थितांची संख्या कमी असल्याने रिकाम्याच असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)