पुलवामात जेव्हा जवान शहीद झाले त्यावेळी मोदी चित्रीकरणात दंग राहिले : राहुल गांधी यांची टीका

डेहराडून – काश्‍मीरात पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला त्यात अनेक जवान शहीद झाले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोर्बेट नॅशनल पार्क मध्ये नॅशनल जिओग्राफी चॅनेल साठी शुटिंग करीत कॅमेऱ्यांना पोझ देण्यात व्यस्त होते अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. उत्तराखंड येथे पक्षाच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की या घटनेची माहिती मिळताच आम्ही सरकारबरोबर राहण्याची भूमिका घेत सरकारच्या पाठीशी राहण्याची नैतिकता दाखवली आणि मी स्वता माझे अनेक कार्यक्रम रद्द केले.

ते म्हणाले की त्या दिवशी मोदी हे नॅशनल जिओग्राफी चॅनल साठी कोर्बेट नॅशनल पार्क मध्ये तीन ते चार तास शुटींग करीत राहिले. त्यांना देशाच्या शहीद जवानांची कसलीही तमा नव्हती पण तरीही ते आपण खरे देशभक्त असल्याचा दावा करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर आली तर देशातील प्रत्येकाला किमान वेतन दिले जाईल आणि त्यांचे पैसे त्यांच्या थेट खात्यात पोचते केले जातील. अशा प्रकारची योजना देशात लागू करणारा भारत हा जगातील पहिला देश असेल असे ते म्हणाले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)